Home » Gurukul

Gurukul

गुरुकुलाचे महत्त्व

भारतातील निवडक पवित्र क्षेत्रांपैकी बाहुबली (कुंभोज) हे एक अतिशय पावन ‘अतिशय क्षेत्र आहे. हे ठिकाण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आहे. हातकणंगल्यापासून ७ किलोमीटर उत्तरेला बाहुबली डोंगराच्या निसर्गरम्य पायथ्याशी श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली ही संस्था शतकोत्तर महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. ही संस्था स्थापन होण्यापूर्वी शेकडों वर्षांपासून येथे साधुसंतांचा विहार, वास्तव्य व ध्यानधारणादी गोष्टी सुरु होत्या. श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली ही संस्था स्थापन झाल्यामुळे येथे अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. त्यामुळे अनेक त्यागी व विद्वानांच्या आगमनाने,वास्तव्याने व त्यांच्या परमपवित्र विचारांनी या परिसराचे महत्त्व वृद्धिंगत होत गेले. प.पू.शांतिसागर महाराजांच्या प्रेरणेने व प.पू.समन्तभद्र महाराजांच्या सदुपदेशाने येथे २८ फूट उंचीच्या भ.बाहुबलींच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर हे स्थान केवळ भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्धीच्या झोतात आले. आजही भ.बाहुबलीच्या प्रांगणात उभे राहिल्यानंतर आपण तहानभूक विसरुन परम आनंदात लीन होतो.

सद्विचार,सदाचार,सद्विद्या व सदुद्यम यातील एक एक गोष्ट जरी आपल्या जीवनात असली तरी आपल्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहात नाही,मग ज्यांच्या जीवनांत वरील चारही बाबी उपलब्ध होतील त्यांचे जीवन समृद्ध,सफल व आनंदी होईल यात शंकाच नाही. बाहुबलीमध्ये गुरुकुलात राहून शिकल्याने या चारही गोष्टी सहज प्राप्त होतात. बाहुबलीचा परिसर अत्यंत निर्मळ असून येथील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. शाळा,मंदिर इत्यादी ठिकाणी आपल्या जीवनास मार्गदर्शन करणारी अनेक सुवचने आपल्या दृष्टीस पडतात. ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’ असे केवळ म्हणण्यापेक्षा इथल्या वास्तव्यात आपल्याला याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.

आजही येथे अनेक त्यागी, पतियाधारी पावक व अतिशय निष्णात अशा विद्वानांना सहवास सहज उपलब्ध आहे. आजकाल सत्संग शिबिराचे आयोजन केले जाते. येथे सत्संग उपलब्ध आहे. दररोज सकाळ, दुपार, सायंकाल, रानी आपणारा विद्वानांच्या प्रवचनांचा, स्वाध्यायाचा लाभ सहज उपलब्ध आहे,
पाचनानि हि जायन्ते स्थानान्यपि सदाभयात् ।‘ संत पुरुषाच्या वास्तव्यामुळे संत पुरुष वास्तव्य करीत असलेल्या स्थानांनाही पवित्रता प्राप्त होते, बाहुबली येथे मुनिश्री बाहबली (नाद) आचार्यश्री शांतिसागर महाराज, मुनिश्री समन्तभद्र महाराज इत्यादी अनेक संतांनी तपर्या केलेली आहे. त्यामुळे सहजच येथील पवित्रता आजही टिकून आहे. अशा या पवित्र क्षेत्राची निवड पूज्यश्री समन्तभद्र महाराजांनी सामाजिक व धार्मिक कार्य करण्यासाठी केली त्यांनी आषाढ शुद्ध २.वी.नि.सं.२४६० म्हणजेच दि.१३ जुलै १९३४ रोजी श्री बाहुबली ब्रहाचर्याश्रम,बाहबली या गुरुकुल संस्थेची स्थापना केली, लहान मुले म्हणजे मातीचा गोळा,त्यारा जसा आकार द्यावा तसा आकार देता येतो, म्हणूनच महाराजांनी त्यावेळी ५ वी ते ११ वीच्या विद्याथ्यांना डोळ्यासमोर ठेवन आपल्या कार्याची आखणी केली. हे वय संस्कारक्षम वय आहे. या वयात केलेले संस्कार त्यांना उर्वरित आयुष्यात अत्यंत उपयोगी पडतात, ही हजारों गुरुकुलवासी विद्याथ्यांच्या अनुभवाने सिद्ध झालेली गोष्ट आहे. सध्या गुरुकुलात फक्त ५ वी ते १० वी पर्यंतच विद्यार्थी राहतात.प्रवेश इ.५ वी ते इ. ८ वी पर्यंतच्या विद्याथ्यांना दिला जातो,
आपला पाल्य सुसंस्कारयुक्त व विद्वान व्हावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असणे स्वाभाविक आहे; परंतु केवळ इच्छा करून कोणत्याही गोष्टीची पूर्तता होत नाही.त्यासाठी कठोर परिश्रम(पुरूषार्थ) व उचित मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे.म्हणूनच आपल्या पाल्याचे शिक्षण उत्तम होण्यासाठी चांगली शाळा निवडणे अत्यंत महत्वाचे आहे. आज अनेक विद्यार्थी सायकलवरुन रिक्षाने किंवा बसने शाळेला जाताना आपण पाहतो. त्यांची बरीचशी ऊर्जा जाण्यायेण्यातच खर्च होते. त्यामुळे थकून घरी आलेला विद्यार्थी अभ्यासाची टाळाटाळ करतो, त्याचबरोबर विद्याथ्यांना घरी सर्व विषयांचे मार्गदर्शन मिळणेही कठीण आहे. म्हणून पालक पुन्हा त्यास शिकवणीसाठी बाहेर पाठवतात, एवढे करुनही आपला पाल्य संस्कारयुक्त विद्वान बनेल याची खात्री नाही,
उपर्युक्त समस्येवर रामबाण उपाय आहे. ‘गरुकलशाळा’. रात्रंदिवस सदाचारी व ज्ञाना गुरुजनांच्या सहवासात राहन बाहवलीच्या निर्मळ व पवित्र वातावरणात लौकिक शिक्षणाचा आध्यात्मिक शिक्षणाची दुर्मिळ संधी प्राप्त होणे ही असामान्य गोष्ट आहे. परम भाग्या अशी संधी मिळत नाही अशी संधी बाहवली बहाचर्याश्रमाने गेल्या अनेक वर्षांत या निर्माण करून ठेवली आहे. म्हणन राज्ञ पालकांना नमन आग्रहाचे निवेदन आहप आपल्या पाल्यास गुरुकुलात पाठवून आपले कर्तव्य पार पाडावे. त्यासाठी स नियमांचे पालन करुन आपल्या पाल्यांच्या हितासाठी संस्थेसपर्ण सहकार्य करावे
गुरुकुल वैशिष्ट्ये

 • १) सन १९३४ पासुनची उज्ज्वल परंपरा.
 • २) शील, ज्ञान, प्रेम, सेवा व व्यवस्था ही गुरुकुल पंचसूत्री प्रत्येकामध्ये रुजविण्याचा
  मन:पूर्वक प्रयत्न
 • ३) तज्ज्ञ, अनुभवी व प्रेमळ कार्यकर्ते.
 • ४) पवित्र व प्रदूषणमुक्त वातावरण,
 • ५) धार्मिक व लौकिक विकासास प्राथमिकता.
 • ६) शारीरिक विकासासाठी दररोज व्यायाम,योगासने,खेळ इ.
 • ७) स्वावलंबनयुक्त जीवन जगण्याची सवय.
 • ८) सदाचारी व निराकुल जीवन जगण्याची कला आत्मसात होणे.
 • ९) महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहवासाने विविध संस्कृतींचा
  अनुभव येणे.
 • १०) देवदर्शन- पूजन इत्यादी विधी अवगत होणे.
 • ११) परस्पर सहकार्य करण्याची सवय लागणे.
 • १२) भारतातील प्रमुख त्यागी व विद्वानांचा लाभ होणे इ.
 • १३) इ. ५ वी ते इ. १० वी साठी सेमी इंग्लिश अध्ययनाची सोय.
 • १४) इ. ८ वी ते १० वी साठी संस्कृत विषयाची सोय,
 • १५) इ. ९ वी व इ. १० वी साठी तांत्रिक (टेक्निकल) विषयाची सोय.
 • १६) संगणक शिक्षणाची सोय
 • १७) दोन समृद्ध ग्रंथालये
 • १) कुसुमबेन मोतीचंद ग्रंथालय २) अनेकांत शोधपीठ ग्रंथालय. याशिवाय गुरुकुलामध्ये वाचनालय व छोटे ग्रंथालय
  स्वतंत्र उपलब्ध आहे.