Home » Gurukul Rule & Regulations

Gurukul Rule & Regulations

गुरुकुलाचे नियम

१) फी भरुन अर्ज मंजूरीचे पत्र मिळाल्याशिवाय पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन येऊनये.
२) इ.५ वी व ६ वीच्या विद्यार्थ्यांना पलंग उपलब्धतेनुसार मिळतील.
३) गुरुकुलात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, दागिने, मोबाईल, भारी किमतीच्या वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत. हातात,गळ्यात दोरा इत्यादी घालण्यास मनाई आहे.
४) गुरुकुलात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने गृहप्रमुख,अधीक्षक वा संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे.
५) विद्यार्थ्यांची वर्तणूक सभ्य,विनयपूर्ण व शिष्टाचारास धरुन असावी. राहणी साधी,स्वच्छ व टापटीपीची असावी.
६) धार्मिक अभ्यासक्रमातही सहभागी होणे बंधनकारक आहे.
७) विद्यार्थ्यांने स्वत:ची सर्व कामे (स्वच्छता,कपडे धुणे, ताट धुणे इ.) स्वत:च करायला हवीत.
८) शाळेचा गणवेश इ. ५ वी ते ७ वी करीता काळी हाफ पँट व पांढरा हाफ शर्ट आणि इ. ८ वी
ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरीता काळी फुल्ल पँट व पांढरा हाफ शर्ट असा युनिफॉर्म आहे. पावसाळ्यात कपडे वाळत नाहीत म्हणून किमान ३ युनिफॉर्म, ३ बनियन, ३ अंडरविअर प्रत्येकाजवळ असावे.
९) सामान ठेवण्यासाठी एक पेटी व कुलूप आवश्यक आहे. सामान्य अंथरुण-पांघरुण असावे.
१०) स्नानासाठी १ बादली,१ मग,पाणी पिण्यासाठी तांब्या, २ वाटी, १ ताट इ. साहित्य आवश्यक आहे.
११) दिवाळी व उन्हाळी सुट्टीत मुलांना त्यांच्या इच्छेनुसार घरी सोडले जाईल. काही विद्यार्थ्यांना गटाप्रमाणे सुट्टीतही राहावे लागेल.
१२) पूर्व परवानगीशिवाय गावी जाता येणार नाही. पालकांनी छोट्या-मोठ्या कामासाठी घरी नेण्याचा आग्रह करु नये. विद्यार्थी विनापरवाना गावी गेल्यास वेळोवेळी केलेल्या नियमाप्रमाणे दंड भरल्याशिवाय गुरुकुलात हजर करुन घेतले जाणार नाही.
१३) पर्युषणपर्व काळात कोणत्याही कारणासाठी विद्यार्थ्यास गावी पाठविले जाणार नाही.
१४) गावच्या यात्रेला विद्यार्थ्यांना सोडले जात नाही.
१५) विद्यार्थ्यांने स्वत:जवळ पैसे ठेवून घेऊ नयेत.स्वत:च्या नावावर पैसे ठेवून आवश्यकतेनुसार पैशाची देवघेव करावी.
१६) पालकांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी पाल्यास भेटण्यास यावे, इतर वेळी येऊ नये. इतर वेळी आवश्यकता वाटल्यास प्रथम अधीक्षकांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
१७) पालकांनी आपल्या पाल्यास कोणत्याही परीस्थितीत बाहेरचे खाद्यपदार्थ देऊ नयेत.
१८) बेशिस्तीने वागणाऱ्या विद्यार्थ्यास संस्थेत ठेवून घेतले जात नाही.
१९) संस्थेत कोणताही आर्थिक व्यवहार पावतीशिवाय करू नये.
२०) वरील कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.