Home » Gurukul Admission

Gurukul Admission

प्रवेश प्रक्रिया
१) जरी बाहुबली येथे बालवाडीपासून पदवीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध असली तरीही गुरुकुलामध्ये फक्त ५ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो.
२) प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रत्येकवर्षी पुनः प्रवेश घेणे आवश्यक आहे. जुन्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देऊन उर्वरित रिक्त जागेवर इतरांना प्रवेश दिला जाईल.
३) जूनपासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी २ मे ते २५ मे पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून सुरु होईल.
४) नापास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही.
५) ६वी, ७ वी व ९ वी साठी जागा अत्यंत कमी असल्याने ब-२ पेक्षा कमी श्रेणी असणाऱ्याकिंवा ५०% कमी गुण असल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांनी सदर वर्गासाठी अर्ज करू नयेत.
६) प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व जबाबदार पालक यांची उपस्थिती असणे आवश्यक आहे. मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित नवीन विद्यार्थ्यांची ४० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
७) प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितलेली फी भरुन प्रवेश निश्चित करावा,अन्यथा त्यांचा प्रवेश रद्द समजला जाईल.

फीचा तपशील

१) दूध, अल्पोपाहार, भोजन, निवास व पर्यवेक्षण इत्यादींच्या खर्चासाठी प्रत्येक आर्थिक दृष्टीने समर्थ विद्यार्थ्यास वार्षिक एक रकमी रू. २३,000/- द्यावे लागतील, जर प्रथम सत्र व द्वितीय सत्राची फी स्वतंत्रपणे भरणार असाल तर प्रतिसत्र रू. १२,५००/भरावे लागतील. विद्यार्थ्याच्या इतर खर्चासाठी डिपॉझिट प्रत्येक सत्रासाठी रु. १,000/ ठेवणे.
२) शालेय खर्च – वह्या,पुस्तके इत्यादींचा खर्च विद्यार्थ्याने स्वत: करावयाचा आहे.
३) शिक्षण फी,सत्र फी,बहिस्थ परीक्षा फी इ.नियमाप्रमाणे भरावी लागते.
४) इ.बी.सी.मंजूर असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी,सत्र फी माफ होते.
५) हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रमामार्फत शिष्यवृत्तीची सोय आहे.
(धर्म परीक्षेत विशेष प्राविण्य आवश्यक)
६) विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतर मध्यंतरी सोडल्यास नियमानुसार फी कपात करुन उर्वरित पैसे परत दिले जातील.
७) आधार कार्ड झेरॉक्स जोडावे.
८) राष्ट्रीयकृत बँक खाते पास बुक झेरॉक्स जोडावे.

गुरुकुल प्रवेश फॉर्म